Ad will apear here
Next
रोटरी वॉटर ऑलिम्पियाडचे आयोजन
अनंतराव पवार महाविद्यालयात होणार स्पर्धा
पुणे : अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च आणि रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने ‘रोटरी वॉटर ऑलिम्पियाड २०१९’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एक आणि दोन मार्च २०१९ रोजी पर्वती येथील ‘अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च’मध्ये ही स्पर्धा होईल. 

यामध्ये पाण्याची कमतरता, पाण्याचे संरक्षण या विषयांवर महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, या क्षेत्रातील तज्ज्ञ यांना शोधनिबंध, प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे. उपस्थितांना या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे. पाण्याची टंचाई, पाणी बचत, पाणी प्रदूषण अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे आणि प्रा. सागर गावंडे यांनी दिली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZHZBX
Similar Posts
पाणी वाहून आणणाऱ्या ‘नीरचक्र’चे वितरण पुणे : ग्रामीण भागात अनेकदा दूरवरून पाणी आणावे लागते. विशेषतः महिलांना खडबडीत रस्त्यांवरून डोक्यावर, कंबरेवर हंडे, कळश्या घेऊन पाणी आणण्याचे अत्यंत कष्टप्रद काम करावे लागते. एकावेळी जास्त प्रमाणात पाणी आणणेही शक्य होत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी ‘नीरचक्र’ हा एक अभिनव उपाय विकसित करण्यात आला आहे. ही पाणी वाहून आणणारी ढकलगाडी आहे
‘जल क्षेत्रातदेखील कारकिर्दीच्या उत्तम संधी’ पुणे : ‘जल क्षेत्र, जलसंधारणाकडे केवळ समाजसेवा या दृष्टीकोनातून न पाहता, त्यात तज्ज्ञता मिळवून कारकिर्दीच्या संधी शोधाव्यात, कारण या क्षेत्राला तज्ज्ञांचीच गरज आहे. त्यातून आव्हानात्मक क्षेत्रात विधायक काम आणि कारकिर्द केल्याचे समाधानही मिळेल,’ असा सूर ‘जल क्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी’ या विषयावरील परिसंवादात उमटला
पुण्यात ‘जलोत्सव २०१९’चे आयोजन पुणे : ‘रोटरी क्लब पुणे डिस्ट्रिक्ट ३१३१’तर्फे २३ फेब्रुवारी ते दोन मार्च २०१९दरम्यान पुण्यात ‘जलोत्सव २०१९’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘रोटरी क्लब पुणे डिस्ट्रिक्ट ३१३१’च्या वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
दुष्काळी कामखेड्यात साठणार तीन कोटी लिटर पाणी पुणे : कामखेडा हे बीड जिल्ह्यामधील दुष्काळी गाव; पण यंदाचा पाऊस पडल्यावर या गावात तब्बल तीन कोटी १५ लाख लिटर पाणी साठवले जाईल. कारण गावातील सर्वच्या सर्व म्हणजे ६५८ घरांच्या छतांवर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता साठवले जाणार आहे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अर्थात पर्जन्यजलसंचयाचा असा समग्र प्रकल्प राबविणारे हे पहिले गाव ठरले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language